देसाईगंज: चोप येथे धान पिकात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला - Be Gadchiroli

Desaiganj,Desaiganj News,wadsa,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,

Desaiganj News,wadsa,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Desaiganj,Gadchiroli Batmya,

अनेक शेतकरी गाढवी नदीच्या पाण्यावर धान पिक घेतात. काल 6 एप्रिल रोजी अचानक चोप येथील पंढरी नाकाडे या शेतकऱ्याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली.

देसाईगंज : तालुक्यातील धान पिकात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याची खबळजनक घटना काल 6 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास चोप मध्ये घडली. या घटनेमुळे परीसरात एक मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव पंढरी बोंडकु नाकाडे (57) असे आहे. 

अनेक शेतकरी गाढवी नदीच्या पाण्यावर धान पिक घेतात. काल 6 एप्रिल रोजी अचानक चोप येथील पंढरी नाकाडे या शेतकऱ्याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली. घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्याला प्राप्त होताच पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी इनामदार, नंदेश्वर यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज येथे पाठविला. पुढील तपास देसाईगंज पोलिस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.