साऊथ चित्रपट ‘आरआरआर’ने (RRR) सध्या सगळीकडे तूफान आणलं आहे. सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे तर बॉक्सऑफिसवरही पहिल्याच दिवसापासून तूफान कमाई केली आहे. चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने मिळून १ हजार कोटींहून (1000 Crore +) अधिक बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.
या आनंदात निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य पार्टी देखील नुकतीच आयोजित केली होती. या पार्टीत टॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक मोठमोठे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शकही उपस्थित होते. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १२ दिवसात ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे. तर हिंदीमध्ये डब केलेल्या या चित्रपटाने १९६ कोटींचा गल्ला जमावला आहे.
सध्या सगळीकडेच या चित्रपटाने अक्षरशः धूमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे अनेक हिंदी चित्रपट पडले आहेत. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘अटॅक’, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आलेली नाही. विशेष म्हणजे RRR हा चित्रपट लवकरच १००० कोटींपेक्षाही अधिक कमाई करेल अशी आशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे.