ब्रम्हपुरी: नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या वतीने कोरोनाने आई-वडील गमावलेल्या विद्यार्थीनीला विशेष शिष्यवृत्तीचे वितरण - Be Network

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,
कोरोनाने आई-वडील गमावलेल्या विद्यार्थीनीला विशेष शिष्यवृत्तीचे वितरण

ब्रम्हपुरी
:- ने. हि. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने कोविड-19 मुळे आई वडिलांच्या मृत्यू झाल्यामुळे ने. हि. महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. नेहा उमेश इजमुलवार बी. एस्सी. भाग - 3 हिला विशेष शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यामधून विद्यापीठ परीक्षा शुल्काची संपूर्ण रक्कम या माध्यमातून तिला देण्यात आली. तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे तिला संपूर्ण फी सवलत अनुदान रक्कम तिला प्राप्त झालेली आहे. अश्याप्रकारे कोविड-19 मुळे संपूर्ण कुटुंब कोलमडल असताना या प्रयत्नाने तिला आर्थिक हातभार लाभणार आहे.

सामाजिक बांधिलकी दृष्टीने व तिच्या पाठीशी महाविद्यालय आहे हि भावना तिला निश्चितच मानसिक बळ देणार आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांनी विद्यापीठा तर्फे मिळालेल्या धनादेश तथा महाविद्यालय तर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती तिला प्रदान केली. तथा उज्जवलं भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्यात. संपूर्ण महाविद्यालय तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांनी येणाऱ्या पुढील परीक्षेकारिता शुभेच्छा दिल्यात. शिष्यवृत्ती वितरण आयोजक डॉ. एस. एम. शेकोकर विद्यार्थी विकास अधिकारी, या प्रसंगी डॉ. मोहन कापगते, डॉ पदमाकर वानखेडे, श्री. संजु मेश्राम उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.