तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur MURDER BREAKING! महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षाची हत्या - Be Network

Chandrapur,Warora,Chandrapur Crime,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur News Live,murder,

Chandrapur News,murder,Chandrapur,Warora,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,

वरोरा
:- वरोरा तालुक्यातील शेगाव (बू) येथील युवक समाज सेवा करणारा तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती शेगाव बू चे अध्यक्ष महेश बबनराव घोडमारे वय वर्षे ३० याची हत्या झाला असल्याची माहिती आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकिस आली आहे.

सविस्तर असे की, शेगाव येथील तंटामुक्त समिती चे अध्यक्ष महेश घोडमारे समाज सेवक असून तो खाजगी क्षेत्रात तो जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, असे विविध कामे तो करून जनतेची सेवा करीत होता त्याच बरोबर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करीत होता.
विशेष म्हणजे महेश हा सर्व कामात तरबेज असून तो गावात तसेच गाव परिसरात त्याची चांगली प्रतिमा होती. परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून महेश हा आपल्या कामाकरीता बाहेर गेला होता तो घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली शिवाय काल २२ तारखेला त्यांच्या भावाने पोलीस स्टेशन शेगाव येथे माझा भाऊ हरविला असल्याची लेखी तक्रार दिली.
तेव्हा येथील पोलीस कर्मचारी देखील आपल्या कामाला लागले दरम्यान आज सकाळी त्यांच्या भाऊ याने अधिक माहिती घेतली असता त्याचा भाऊ मेसा येथून दुसऱ्याच्या दूचाकी बसून वरोरा येथे रवाना झाला असल्याची माहिती समोर आली शिवाय ही गाडी मेसा समोरील जंगलात उभी असल्याची खात्री काही लोकांनी दिली यांच्या आधारे घटना स्थळ गाठले असता झुळपाड त्याची चप्पल, रक्त, रक्त बांबाळ असलेले लोखंडी रॉड व झुळुपा आड प्रेत आढळून आले तेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना देताच येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या ताफ्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास चक्र वेगाने फिरवून आरोपींना अटक केली
पुढील तपास शेगाव स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्रम यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.