'
30 seconds remaining
Skip Ad >

Breaking! आयआयटी-मद्रासमधील ३० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले - Be Network

0

Corona Positive Students In IIT Madras,Covid-19,Corona,India,India News,Madras,Madras Corona Spread, IIT-Madras

मद्रास
: कोरोनाचा संसर्ग (Corona Spread) कमी झान्याने देशातील सर्वच निर्बंध उठवण्यात आले आहे, त्यामुळे जनजीवन हे सुरळीत सुरु झाले आहे. रेल्वे सेवा-हवाई सेवा ही नेहमीप्रमाणे सुरु असून देशात विविध ठिकाणी पर्यटनाचे प्रमाणही वाढले आहे. लसीकरण (Vaccination) मोठ्या प्रमाणात झाले असल्याने देशात कोरोना बांधितांचा आकडा तर गेले काही दिवस हा दोन हजारच्या खाली होता. काही राज्यांनी तर मास्क सक्ती ही रद्द केली आहे. अशातच तामिळनाडू राज्यात आरोग्य विभाग काहीसा चिंतेत आहे. कारण आयआयटी-मद्रास ( IIT-Madras )मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित (Corona Positive Students In IIT Madras) झाले असल्याचं समोर आलं आहे.

याआधी १९ एप्रिलला कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आल्यावर आयआयटी-मद्रासच्या संकुलात कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तेव्हा १२ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा निर्जंतुकीकरण, कोरोना चाचण्या वगैरे खबरदारीचे उपाय हे मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. तेव्हा आता यामध्ये आणखी १८ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. त्यामुळे आयआयटी-मद्रासच्या संकुलातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांचा आकडा हा आता ३० वर पोहोचला आहे. तेव्हा आणखी कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी आणखी उपाययोजना आरोग्य विभागाकडून अंमलात आणल्या जात आहे.

आयआयटी-मद्रासच्या संकुलातील परिस्थिती काहीशी गंभीर एकीकडे असतांना देशातही काही प्रमाणात कोरोनाबाधितांचे प्रमाण हे गेल्या २४ तासात वाढलेले बघायला मिळाले. गेल्या २४ तासात दोन हजार ४५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. देशात सध्या एकूण १४ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित असून ते उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत एकुण पाच लाख २ हजार ११६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×