Nashik: आधीच दोन लग्न झालेल्या एका तरुणाने १८ वर्षाच्या युवतीला पळवून नेल्याच्या रागातून युवतीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबई नाका परिसरात सहवास नगर मागे हा प्रकार घडला असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात युवतीच्या दोन भावांसह तिच्या नातेवाईकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पाटील अस मृताचे नाव असून यापूर्वी त्याचे दोन लग्न झाले असून त्याला मुलेही आहेत. अस त्याने पुन्हा सहवास नगर मधील एका युवतीला गुजरात मध्ये पळवून नेले होते.
युवतीच्या नातेवाईकांनी शोध घेत दोघांना गुजरात मधून सहवास नगर येथे आणून बेदम मारहाण केली, त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मृत्यू झाला आहे.
संशयितांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.