'
30 seconds remaining
Skip Ad >

Malnutrition relief: कुपोषणमुक्तीचा 'गडचिरोली पॅटर्न'; पाच महिन्यांत ३१०९ बालकांना लाभ - Be Gadchiroli

0

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli

Gadchiroli
: लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात २ ऑक्टोबर २०२१ पासून विशेष आहार योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अंगणवाडी केंद्रातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील अतितीव्र कुपोषित, मध्यमतीव्र कुपोषित आणि तीव्र कमी वजनाच्या बालकांना कुपोषणमुक्त करून सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. या कालखंडात एकूण १० हजार ४१ कुपोषित बालकांपैकी ३ हजार १०९ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ग्रामपंचायतीसाठीच्या १५व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतून नियमित दिल्या जाणाऱ्या आहाराव्यतिरिक्त दिवसातून एक वेळा विशेष आहार दिला जात आहे. या योजनेतून कुपोषित बालकांचे आढळले.

प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने नऊ प्रकारच्या पाककृती तयार करून बालकांना अंगणवाडी केंद्रात २ आक्टोबर २०२१ पासून देण्यात येत आहेत. आधी जिल्ह्यात गंभीर तीव्र कुपोषित बालके १०१७, मध्यम तीव्र कुपोषित बालके ६०९४, गंभीरपणे कमी वजनाची बालके २९३० इतकी होती. 

परंतु, २ ऑक्टोबर २०२१ पासून विशेष आहार योजना सुरू केल्यानंतर महिन्यांच्या ५ कालावधीत बालकांचे वजन, उंची आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषित बालके ५०४, मध्यम तीव्र कुपोषित बालके ४३१०, गंभीरपणे कमी वजनाची बालके २११८ आढळून आली आणि कुपोषित बालकांचे प्रमाण ३१०९ संख्येने कमी झालेले

असा उपक्रम राबवणारा गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा. सध्या गडचिरोली पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू असून या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात केली जाऊ शकते. या योजनेमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून जिल्हा कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करीत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास ए.के. इंगोले यांनी दिली. a

दरम्यान, या कार्यक्रमाची दखल घेऊन सह्याद्री दूरदर्शनच्या चमूने गडचिरोली जिल्ह्यातील पारडी या गावातील अंगणवाडीला भेट देऊन माहिती घेतली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×