'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर शहरातील रामसेतू पुलाच्या खाली मिळला 'त्या' तरूणीचा मृतदेहाचा शिर - Be Chandrapur

0

Chandrapur News,Chandrapur,Bhadrawati,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,


चंद्रपूर:- आठवडाभरापूर्वी भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात निर्वस्त्र, आढळून आलेला त्या तरूणीचा मृतदेहाचा शिर आज (10 एप्रिल) ला सायंकाळी चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाच्याखाली आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर 22 वर्षीय तरूणीच्या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे. त्या अल्पवयीन (मुलगी) आरोपीने दिलेल्या कबुलीमध्ये, वारंवार मित्रांमध्ये आपला अपमान करीत असल्याने बदला घेण्यासाठी त्या तरूणीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर गळा कापल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तर सहकारी आरोपी मात्र फरार झाला आहे.

सोमवारी (4 एप्रिल) ला सकाळी 22 वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरूणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात बेवारस फेकून देण्यात आला होता. चार दिवसांनंतर शुक्रवारी पाचव्या दिवशी त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
सदर 22 वर्षीय तरूणी ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आहे. तरूणीची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्या तरूणीच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत हत्येबाबत धक्कादायक माहिती उघड झाली. तिने दिलेल्या कबुली मध्ये, सदर मृतक तरूणी ही आरोपी मुलीची मैत्रीण होती. एकाच खोलीत त्या भाड्याने राहत होत्या. दोघींमध्ये चांगली मैत्री सुरू असताना एक दिवस दोघीत वैयक्तिक कारणांवरून भांडण झाले. त्यानंतर मृतक तरूणी ही आरोपी मुलीचा वारंवार अपमान करीत होती. तिच्याकडून होणारा अपमान असह्य झाल्याने मृतक तरूणी बाबत तिरस्कार निर्माण झाला होता. त्यामुळे आरोपी मुलीने वारंवार होणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या तरूणीच्या हत्येचा कट रचला. याकरिता तिने एका मित्राची मदत घेतली. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार मित्राला सांगितला. त्यानंतर मित्राच्या मदतीने हत्येचा प्रकार समोर आला. दोघांनी त्या तरूणीकरीता रचलेल्या कटाला पूर्णत्वास नेण्यासाठी घडामोडी सुरू केल्या.
मृतदेह आढळून येण्याच्या आदल्या दिवशी 3 एप्रिल 2022 ला रात्री 08:45 वाजताच्या सुमारास वरोरा नाका येथे त्या तरुणीला बोलावून घेण्यात आले. त्या ठिकाणावरुन त्या तरुणीला एका निर्जनस्थळी नेण्यात आले. त्या ठिकाणी अल्पवयीन आरोपी मुलीने त्या तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर खाली पाडून तिच्या मांडीवर पाय पकडून चाकूने वार केले. तरुणीच्या जीविताशी हा थरार सुरू असताना दुसऱ्या सहकारी आरोपीने तरुणीच्या पोटावर बसून गळा आवळून खून केला. एका अपमानाचा बदला त्या तरुणीचा खून करू घेण्यात आला.
हत्येनंतर त्या तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी आणि तिचा मित्र एवढ्यावरच थांबले नाही तर त्यात थरारक हत्याकांडानंतर तरुणीचा मुंडका धडा वेगळा करण्यासाठी पुढे आलेत. दोघांनी चाकूने आळीपाळीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचा धड आणि शीर वेगळा केला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यापलीकडे जाऊन मृतदेहावरील सर्व वस्त्र काढण्यात आले आणि धडाला निर्जनस्थळी ठेवून मुंडका आणि कपडे घेऊन दोन्ही आरोपी मोटरसायकलने पसार झालेत.
भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात निर्वस्त्र, त्या तरूणीचा फक्त धड आढळून आल्यानंतर तब्बल चार दिवस मृतदेहाची ओळख पटली नाही. पाचव्या दिवशी चंद्रपूर पोलिसांना ओळख पटविण्यात यश आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मृत तरुणीच्या अल्पवयीन मैत्रिणीला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर हत्याकांडाचे गुड उकलल्या गेले.
रविवारी चंद्रपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हत्याकांडाची माहिती दिली. मात्र धडा वेगळे झालेले मुंडके कुठे आहे? ते सांगितले नाही. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाखालील नदीत त्या तरुणीचा शीर फेकून दिल्याची माहिती पुन्हा ताब्यात असलेल्या अल्पवयीन आरोपीने दिली.
गोताखोरांच्या माध्यमातून शिर शोधण्यासाठी शोध म्हणून राबविण्यात आली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर रामसेतू पुलाच्या खाली असलेल्या नदीत त्या तरुणीचा शिर आढळून आला आहे. पोलिसांनी त्या तरूणीचा शीर ताब्यात घेतलेला आहे. सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि आता धडा वेगळा झालेला शिर रामसेतू पुलाच्या खाली नदीत आढळून आल्याने आठवडाभरापासून तरुणीच्या हत्याकांडाचा सुरू असलेला तपास आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×