'
30 seconds remaining
Skip Ad >

कुरखेडा: दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक जण जागीच ठार! - Be Gadchiroli

0

kurkheda,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,

कुरखेडा
: भरधाव वेगाने समोरील येणाऱ्या दोन दुचाकींची समोरा-समोर जबर धडक होऊन या अपघातात ( collision ) एकजण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील चिखली फाट्यावर (Chikhali fork )  रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव भूषण मधुकर मेश्राम (वय २०, राहणार कुरखेडा) असे आहे.

भूषण मेश्राम (Bhushan Meshram)  हा आपल्या दुचाकीने महादेवगड देवस्थान अरततोंडी येथेदर्शन घेण्यासाठी गेला होता. सोबत त्याचा भाऊ आकाश मेश्राम हासुद्धा होता. दर्शन घेत काला खाऊन तो कुरखेडाकडे दुचाकीने परत येत असताना मुख्य मार्गावरील चिखली फाट्याजवळ कुरखेडाकडून गेवर्धाकडे येणाऱ्या दुचाकी (एम.एच.३३ वाय. ६५५५) शी जोरदार धडक झाली. यात दोन्ही दुचाकी चालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले. मात्र, आकाश मेश्राम याला जराही धक्का लागला नाही.

दोन्ही दुचाकीस्वार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडले होते. याचवेळीदेसाईगंजवरून कुरखेडाकडे युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रा. उमा चंदेल, युवासेना उपजिल्हा प्रमुख सज्जाद पठाण, नगरसेवक अतुल झोडे यांनी अपघातग्रस्तांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले; परंतु डॉक्टरांनी भूषण मेश्राम याला मृत घोषित केले. दुसरा वाहनचालक गंभीर व बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. शुभमच्या डोक्याला मार लागला. हेल्मेटमुळे त्याचे प्राण वाचले असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×