Share Market News: शेअर बाजारात घसरण सुरुच, आज सकाळीच शेअर बाजार पुन्हा 422 अंकानी गडगडला, बाजार अस्थिर राहण्याची शक्यता - Batmi Express

Share Market News: शेअर बाजारात घसरण सुरुच, आज सकाळीच शेअर बाजार पुन्हा 422 अंकानी गडगडला, बाजार अस्थिर राहण्याची शक्यता

Share Market News: शेअर बाजारात घसरण सुरुच, आज सकाळीच शेअर बाजार पुन्हा 422 अंकानी गडगडला, बाजार अस्थिर राहण्याची शक्यता

मुबंई
: रशिया आणि युक्रेनचे युद्धाते परिणाम जगभरातील शेअर बाजारात दिसत आहेत. अमेरिकन शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये 422 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये 114 अंकांची घसरण झाली. त्यामुळं सोमवारप्रमाणेच मंगळवारी देखील बाजारात घसरण झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. युद्धामुळे लागलेल्या आगीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार होरपळले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे जवळपास 6.32 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामुळं गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होणार असल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील स्टॉकच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. तर, आयटी, फार्मा, ऊर्जा, रिअल इस्टेट, ऑइल आणि गॅस सेक्टरमधील शेअर्सही वधारताना दिसत आहेत. बँकिंग, ऑटो आणि मेटल सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

आज सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 15 शेअर्स वधारले आहेत. तर, निफ्टीमधील 50 कंपन्यांपैकी 21 शेअर्सची घसरण झाली. पॉवर ग्रिडच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. सर्वात मोठी घसरण हिंदाल्कोच्या शेअरमध्ये दिसत आहे. सकाळी 10 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी 24 अंकांनी वधारला.   शेअर बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.