शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
अहेरी ( Gadchiroli Student Suicide ) : तालुक्यातील जिमलगट्टा येथील शासकीय आश्रम शाळेत मुलींच्या वसतीगृहात असणाऱ्या एका विद्यार्थिनीने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. सदर विद्यार्थ्यांनीचे नाव मंजुळा रामा मडावी वय वर्ष १७ असून ते अकरावी च्या वर्गात शिकत होती.
मार्च ०४, २०२२
0
Most Read News List
मंजुळा मडावी हे सिरोंचा तालुक्यातील रमेशगुडाम येथील रहिवासी होती. वसतिगृहातील स्नाणगृहाच्या भिंतीवर असलेल्या लोखंडी पाईपाल नायलॉन च्या पिवळ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री अंदाजे १२ वाजताच्या दरम्यान एका मुलीच्या निदर्शनास आले. मुलींनी लगेच अधीक्षिका दिशा अंबादे यांना माहिती दिली. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापक महम्मद खालीख यांना कळविले. त्यानंतर जिमलगट्टा आरोग्य केंद्राच्या पथकाने येऊन तपासणी केली असता. मंजुळा मडावी मृत असल्याचे स्पष्ट केले.
जिमलगट्टा उपपोलीस स्टेनशात घटनेची देण्यात आली. असुन पोलिस उपनिरीक्षक सागर देवकर यांनी तपास सुरू केला मात्र अद्याप मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.