Gondwana Summer Exam 2022 Offline: गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा-2022 ऑफलाईन; "या" तारखेपासून घेण्यात येणार परीक्षा - Batmi Express

Gondwana Summer Exam 2022 Offline,गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा-2022 ऑफलाईन,Gondwana Summer Exam 2022,Gondwana Summer Exam,Gondwana Universi

 

Gondwana Summer Exam 2022 Offline,गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा-2022 ऑफलाईन,Gondwana Summer Exam 2022,Gondwana Summer Exam,Gondwana Universi
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन

गडचिरोली/ चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळानी नुकतीच अधिसुचना काढली असून उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षेचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मधील उन्हाळी लेखी परीक्षा ०१ जुन २०२२ पासून ऑफलाइन पध्दतीने सुरू होणार आहे. ( Gondwana Summer Exam 2022 Offline

कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी २०२१ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली होती. पण आता कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने काही जिल्ह्यांमध्ये निर्बंधात १००% शिथिल केले आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी लेखी परीक्षा ०१ जुन २०२२ पासून ऑफलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा ऑफलाईन ( Gondwana Summer Exam 2022 Offlineपद्धतीने घेण्यात येणार आहे.

काय आहे अधिसूचना....

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मधील उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षा विद्यापीठाच्या शैक्षणिक दिनदर्शिका (Academic Calendar) नुसार दिनांक ०१ जुन २०२२ पासून ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

यासंबंधात प्राचार्यांनी परीक्षा पद्धतीबाबत सर्व संबंधित विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.