आजपासून महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरु |
HSC Exam 2022: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील 2 हजार 996 मुख्य केंद्रे तर 6 हजार 639 उपकेंद्रे असे मिळून एकूण 9 हजार 635 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
परीक्षा 2 वेळांमध्ये पार पडणार :
ही परीक्षा एकूण 2 वेळेत पार पडणार आहे. त्यानुसार सकाळी 10.30 ते 2 आणि दुपारी 3 ते 6.30 या वेळेत परीक्षा पार पडणार आहे.
महत्वाचे
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मास्क आणि हँड सॅनिटायजर ठेवण आवश्यक असेल. बारावीची परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 30 मिनिटं आधी पोहचायचं आहे.