गडचिरोली | आलापल्लीच्या जंगलात वाघाचा मृत्यू | Deadly Tiger found in Alapally forest | Batmi Express

Alapally,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Deadly Tiger found in Alapally forest

Alapally,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Deadly Tiger found in Alapally forest
प्रतिनिधी फोटो वापर बातम्या उद्देश

गडचिरोली (Gadchiroli
 - आलापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत नेंडर बीट, खंड क्र. 12 मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला. तो अवघा दीड वर्षाचा नर आहे. त्यामुळे मोठ्या नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Deadly Tiger found in Alapally forest  )

सदर घटना शनिवारी रात्री घडली असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. दरम्यान ट्रॅप कॅमेराच्या माध्यमातून या घटनेचा अधिक उलगडा करण्याचे काम सुरू आहे.

हे देखील वाचा:

ब्रह्मपुरीत ट्रकच्या अपघातात एक जण ठार

आलापल्ली जंगल परिसरात वाघांचे अस्तित्व असून मागील महिन्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील मौसम येथे एका पट्टेदार वाघिणीची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाचाही गांभीर्याने तपास केला जाणार आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. प्रस्थापित परिक्षेत्रात आधीपासून असलेला वाघ अन्य कोणत्याही दुसऱ्या नर वाघाला आपल्या परिक्षेत्रात येऊ देत नाही. त्यामुळे दोन नर वाघ आमने- सामने आल्यास त्यांच्यात लढाई होण्याचे प्रसंग अनेक वेळा होतात. ही लढाई इतकी भीषण असते की दोन्ही वाघ गंभीर जखमी होतात. त्यात कमजोर असलेला वाघ हार पत्करून निघून जातो किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू ओढवतो. या वाघाचा मृत्यू त्यातूनच झाला असण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी वन अधिकारी तूर्त उपलब्ध होऊ शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.