ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विद्युतीकरणासाहित चौपदरी सिमेंटीकरण करा
- ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विद्युतीकरणासाहित चौपदरी सिमेंटीकरण करा.
- केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची मागणी.
- तालुक्यातील लाडज व नान्होरी जवळील पुल तयार करण्याचीही केली विनंती.
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग 353-डी हा जात असून सदर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण नगरपरिषद ब्रम्हपुरी च्या हद्दीपर्यंत झाले आहे. परंतु ब्रम्हपुरी शहराच्या सौंदरीकरणाच्या दृष्टीने सदर महामार्गाचे ब्रम्हपुरी शहरातून विद्युतीकरण सहित चौपदरी सिमेंटीकरण होणे आवश्यक आहे. या संदर्भात ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब यांची नागपूर येथे भेट घेऊन सदर काम करण्याची मागणी केली. मागणीचे पत्र प्रा. अतुल देशकर यांनी ना. नितीनजी गडकरी यांना दिले.
हे देखील वाचा:|ब्रह्मपुरीत ट्रकच्या अपघातात एक जण ठार