भीषण अपघातात गडबोरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू |
सिंदेवाही (Sindewahi) | नागभीड ते सिंदेवाही मार्गे प्रवास करत असताना युवकाचा मृत्यू सिंदेवाही वरून दहा किलोमीटरवर गडबोरी येथील 28 वर्षीय सागर माकोडे याचा रोड अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर व्यक्ती काही कामा निमित्य रात्रो 9 वाजता आपल्या मित्रा सोबत नागभीड ला गेला होता नागभीड ते सिंदेवाही असा प्रवास आपल्या दुचाकीने करीत असताना नागभीड पोलिस स्टेशनचे हद्दीत चिंधी चक ह्या गावाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातात डोक्यावर जबर मार लागल्याने मेंदू बाहेर आला व जागीच ठार झाला. सदर युवकाचे गाडी दुरुस्तीचे दुकान आहे. त्याच्या मागे त्याचा परिवार आई बाबा भाऊ पत्नी आहे घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबातील व्यक्तींवर दुःखाचे सावट पसरले आहे. ( Tragic accident Youth in Gadbori died on the spot )
हे देखील वाचा:
|ब्रह्मपुरीत ट्रकच्या अपघातात एक जण ठार
मागील वर्षी लग्न झाले होते पत्नी 3 महिन्याची गरोदर आहे. परिसरातील चाहता सागर मिस्त्री असल्याने सिंदेवाही गडबोरी परिसरात शोककळा पसरली आहे.