चंद्रपूर: पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर - Batmi Expres

चंद्रपूर | पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,
चंद्रपूर | पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,
चंद्रपूर: पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

चंद्रपूर ( Chandrapur News ) राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार, दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी येथे आगमन.

हे देखील वाचा:

चंद्रपूरने आपला सुपुत्र गमावला! | Chandrapur lost his son!

दुपारी 3.15  वाजता उपजिल्हा रुग्णालय,ब्रह्मपुरी येथे अपंगांना प्रमाणपत्राचे वितरण. सायंकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 6 वाजता देलनवाडी, ब्रह्मपुरी येथे आस्था हाॅस्पिटलच्या नविन इमारतीचे उद्घाटन. सायंकाळी 7 वाजता ब्रह्मपुरी येथुन गडचिरोलीकडे प्रयाण.

हे देखील वाचा:

ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

मंगळवार, दि.1 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता मार्कंडा देवस्थान,गडचिरोली येथे आगमन व दर्शन. दुपारी 12 वाजता  देवटोक ता.सावली येथे सभागृहाच्या भुमीपुजनास उपस्थित. दुपारी 1 वाजता चक विरखल येथे सांत्वनपर भेट. दुपारी 2 वाजता सावली नगरपंचायत येथे आगमन.दुपारी 2.15 वाजता सावली नगरपंचायतीच्या नवनियुक्त नगरसेवकांसोबत बैठक. सायकांळी 4.30 वाजता सोनापूर ता. नागभीड येथील सातबहिणी देवस्थान पेरजागड येथे कार्यक्रमास उपस्थिती. सायकांळी 5 वाजता सोनापूर ता. नागभीड येथून नागपूरकडे प्रयाण.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.