'
30 seconds remaining
Skip Ad >

Bramhapuri Tiger Attack - ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला - Batmi Express

0

Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri Marathi News,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,
Chandrapur Tiger Attack - ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला 

ब्रह्मपुरी ( Bramhapuri Tiger Attack  ): चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षात पुन्हा भर पडली आहे, कारण वाघाच्या हल्ल्यात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला, सदर हल्ल्यात तो इसम गंभीर जखमी झाला.  ( Chandrapur Tiger Attack

सदर घटना वनपरिक्षेत्रातील उत्तर वनपरिक्षेत्र मेंडकी ( Mendaki )  अंतर्गत येणाऱ्या तळोधी खुर्द ( Talodhi Khurd )  विकास नगर जंगल परिसरात घडली. घटना दिनांक २५ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली, होमराज ठवकर वय (४५) असे जखमी इसमाचे नाव आहे. 

होमराज ठवकर हा इसम आपल्या एक दोन मित्रा सोबत सरपण गोळा करण्यासाठी विकास नगर जंगल परिसरात सकाळी घरून निघाला तद्वतच सरपण गोळा करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक होमराजवर हल्ला चढवला. त्याक्षणी त्यांनी किंचाळी मारली असता त्यांच्या सोबतीला असलेले दोन्ही साथीदार धावून येत आरडाओरड केली असता वाघाने तिथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. 

नशीब बलवत्तर म्हणावे लागेल की साथीदारांच्या आवाजाने होमराजचा जीव वाचला, जखमी अवस्थेत असलेल्या इसमाला सोबतीला असलेल्या दोन्ही मित्रांनी गावात आणले. जखमी होमराजवर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर त्याला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे माहिती आहे. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर ब्रह्मपुरी वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पुनम ब्राह्मणे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या मार्गदर्शनात उत्तर वनपरी क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक शिंदुरकर यांच्यासह वनरक्षक टेकाम, ठाकरे यांनी घटनेचा पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×