HSC Exam 2022
पुणे ( HSC Exam 2022 ): यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. प्रशासनाने यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. आता बारावीच्या परीक्षेसंदर्भात एक नवी बातमी समोर येत आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान एक तास लवकर यावे लागणार आहे. राज्यात जरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी प्रशासनाने कुठलाही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे.
बारावीचे पेपर सकाळी साडे दहा वाजता सुरू होता. विद्यार्थ्यांनी सकाळी साडे नऊ वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अपेक्षित आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार
परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थी आहाराकडे आणि दैनंदिन गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.
तसेच वर्गात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. जेणेकरून कुणाला ताप तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास समोर येईल. यासाठी पालकांनीही सहकार्य करावे असे आवाहन शिक्षकांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण :
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण मिळणार आहेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.