Crime News: धक्कादायक! स्वयंपाकास उशीर झाल्यानं पतीने पत्नीला जिवंत जाळलं... - Batmi Express

Be
0

Crime News: धक्कादायक! स्वयंपाकास उशीर झाल्यानं पतीने पत्नीला जिवंत जाळलं,Hingoli News,crime news,Crime,Hingoli,
स्वयंपाकास उशीर झाल्यानं पतीने पत्नीला जिवंत जाळलं

Crime News
: हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील सवना येथे पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. स्वयंपाक करण्यास उशीर झाल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला.

सेनगांव तालुक्यातील सवना इथं एक 90 वर्षीय आजोबा आणि 78 वर्षीय आजी या दोघांचा सरत्या वयात संसाराचा गाडा मोडलाय.  स्वयंपाक उशिरा केल्याच्या रागातून 90 वर्षीय आजोबा कुंडलिक शिवराम नाईक यांनी आपल्या 78 वर्षीय पत्नीचे दोरीच्या सहाय्याने हात-पाय बांधून रॉकेल अंगावर टाकलं. 

तदनंतर माचीसच्या काडीने पत्नीला जिवंत पेटवून दिलं. या घटनेत सुंदराबाई नायक असं मयत झालेल्या आजीचे नाव आहे. या प्रकरणी गोरेगांव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->