भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन |
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. लतादीदींनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.