आत्महत्या | शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीनीची आत्महत्या - Batmi Express

Be
0
Suicide in Kolhapur,suicide,suicide news,Kolhapur,Arjunawada,शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या

Kolhapur: शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या  ( Suicide in Kolhapur ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून 6 दिवसांपूर्वी विष प्राशन (Poison) केले होते. उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. ही घटना कागल तालुक्यातील अर्जुनवाडा (Arjunawada) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असं मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी आरोपी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे.

हे देखील वाचा:

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या! 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमित कुंभार (Amit Bhimrao Kumbhar) हा कागल तालुक्यातील मुगळी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्रास देत होता. मागील महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिला तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या सोबत विवाह करण्यास तयार होईन, असं म्हणत मेसेज पाठवत होता.

या सर्व प्रकारामुळे 22 जानेवारी रोजी आकांक्षाने कंटाळून आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, 27 जानेवारी रोजी आकांक्षाने, “मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर दिला होता.” मात्र, उपचार सुरू असतानाच काल दुपारी तिचा मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->