Chandrapur Corona Latest News: 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 31 जण नव्याने कोरोना बाधित (Corona Positive ) आले आहेत. तर बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, बल्लारपूर 2, राजुरा 2, चंद्रपूर 1,भद्रावती 1 तर चिमूर येथे 1 रुग्ण आढळून आले. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे.
(ads1)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 944 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 339 झाली आहे. सध्या 60 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 3 हजार 406 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 13 हजार 50 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.