ओमायक्रॉन (Omicron) चा भारतातील पहिला बळी (1st Omicron Death In India) गेला आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
(ads1)
झपाट्याने पसरणाऱ्या ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या व्हेरिएंटचा भारतात पहिला बळी (1st Omicron Death In India) गेला आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मृत्यू झालेला ७२ वर्षीय रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह निघाला होता, त्यानंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र स्वास्थासंबंधीत गुंतागुंतीमुळे तो रुग्णालयात दाखल होता. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की हा मृत्यू ओमायक्रॉनचाच मानला जाईल. कारण तो ओमायक्रॉनची लागण झाल्यापासून रुग्णालयात दाखल होता.
(ads1)
देशात ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २,१३५ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५३ आणि दिल्लीत ४६४ रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनवरील २,१३५ रुग्णांपैकी ८२८ बरे झाले आहेत.भारतातील कोरोना रुग्णसंख्येने आता वेग पकडला आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५८ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोनाच्या ५८ हजार ९७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.