'
30 seconds remaining
Skip Ad >

भामरागड येथे वाघाची शिकार ; वाघाची पुर्ण कातडी जप्त | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Gadchiroli,Gadchiroli Batmya,
भामरागड येथे वाघाची शिकार- News File Pic

भामरागड: अहेरी मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने मृत वाघाचे अवयव येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या दक्षता पथकाला मिळाली.त्यानुसार वनविभागाच्या दक्षता समितीचे पथक गोंडपिपरी येथील नवीन बस स्टँड समोर गस्त ठेवून बसले होते. सायंकाळी  गोंडपिपरी येथिल रोहित बार समोर पाच बाईकस्वारांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दात,मिश्यासहीत असलेले वाघाचे पुर्ण कातडी जप्त करण्यात आली.  ( Tiger hunting at Bhamragad )

बंडू इरप्पा वड्डे, सूधाकर लच्चू तिम्मा,संदिप नरसिम्हा सडमेके ,शुभम शंकर गोरले , राकेश बुधाजी डोंगरे अशी आरोपींची नावे आहेत.या पाच आरोपीचा बयाणात डोली पेंदा पुलाटी याचे नाव पुढे आले. तो गडचिरोलीत जिल्ह्यातील कुमणार येथिल रहीवासी आहे.वनविभागाचा पथकाने डोली पुलाटी याला आज ताब्यात घेतले.या प्रकरणातील एकून आरोपींची संख्या सहा झाली आहे.

हे नक्कीच वाचा: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडलेले

शिकार केलेला वाघ भामरागड तालुक्यातील होता,अशी कबुली आरोपींनी दिली आहे.न्यायलयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची वनकोठडी मंजूर केली आहे. ही कार्यवाही उपवनसरक्षक अ.द.मुंडे,सहाय्यक वनसंरक्षक मिलीश शर्मा, वनसंरक्षक मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र आधिकारी एफ.ए.गादेवार, नरेश चापले, लडके,पिंपळकर, धानोरकर, फुलझले यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×