Nagpur News: खबळजनक घटना! काम देण्याच्या बहाण्याने म्हाताऱ्याचा 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार | बातमी एक्सप्रेस

Nagpur News: खबळजनक घटना! काम देण्याच्या बहाण्याने म्हाताऱ्याने २० वर्षीय तरुणीवर अत्याचार,nagpur news,Nagpur,Nagpur Crime,Nagpur,

Nagpur News: खबळजनक घटना! काम देण्याच्या बहाण्याने म्हाताऱ्याने २० वर्षीय तरुणीवर अत्याचार,nagpur news,Nagpur,Nagpur Crime,Nagpur,
म्हाताऱ्याने २० वर्षीय तरुणीवर अत्याचार - File PIc

नागपूर (Nagpur) :
 कोंढाळी परिसरात ७५ वर्षीय वृद्धाने २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. अत्याचार प्रकरणाची पोलिसांत तक्रार न देण्यासाठी वृद्धाचा मुलगा व पुतण्याने तरुणीला ठार मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून वृद्धासह तिघांना अटक केली. जावलसिंग काळू चव्हाण (वय ७५), त्याचा मुलगा निळकंठ ऊर्फ कंठ्या चव्हाण व पुतण्या पांडुरंग चव्हाण तिन्ही (रा. आगरगाव), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे नातेवाइकांसोबत नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे ही तरुणी घरून निघाली आणि जावलसिंग याला भेटली. जावलसिंग याने तिला शेतात काम करण्याच्या बहाण्याने कोंढाळी येथे आणले. २२ ऑक्टोबरला जावलसिंग याने या तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला.

हेही पण वाचा : जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचाच जीवा घेतला! एक नाही तर तब्बल 30 वेळा सपासप वार केले

या अत्याचाराच्या विरुद्ध तरुणी पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत असताना कंठ्या व पांडुरंग या दोघांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने या प्रकाराची परिसरातील एका नागरिकाला माहिती दिली. त्याने तरुणीला धीर देत पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. तरुणीने कोंढाळी पोलिसांत तक्रार दिली. त्या नंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कदम यांनी तिघांना अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.