तिघींचा ओढ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - News Pic |
Sangli News: ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातील टाकळी याठिकाणी पारधी समाजातल्या दोन तरुणींसह एक बालिकेचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यातील टाकळी ओढ्यात दोन पारधी तरुणी व एक बलिकेचा बुडून मृत्यू झाला. ओढ्यात अंघोळीला गेल्यानंतर दुर्दैवी घटना घडली आहे. टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ( bath-drowned-in-the-river-and-died )
नंदिनी देवा काळे, वय 16, मेघा चव्हाण काळे, वय 18 आणि स्वप्नाली टवळ्या पवार, वय 6 अशी तिघांची नावे आहेत. हे सर्व जण टाकळी येथील आंबेडकर नगर मधील पारधी वस्ती याठिकाणी राहतात.
हेही पण वाचा : जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचाच जीवा घेतला! एक नाही तर तब्बल 30 वेळा सपासप वार केले
दुपारच्या सुमारास तिघी जण अंघोळीला गेल्या होत्या, त्या परत न आल्याने त्यांच्या घरांच्यानी शोध सुरू केला. शोध सुरू असताना ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल, कपडे पडल्याचे दिसून आल्याने पाण्यात बुडल्याची शंका आली. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत, अथक प्रयत्नानंतर तिघींची मृतदेह शोधून बाहेर काढले.