प्रा. प्रदिप चापले
Gadchiroli: वनश्री कला महाविद्यालय कोरची येथील प्रा. प्रदिप चापले यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा “बेस्ट कोव्हीड वीर” (Best Covid Veer ) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणार्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. यावर्षीसुद्धा विविध पुरस्कारांसाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यावर्षी विद्यापीठाने कोव्हीड 19 च्या संदर्भात कार्य करणार्यांसाठी “बेस्ट कोव्हीड वीर” पुरस्कार देण्याचे ठरवून प्रस्ताव मागविले होते. यातून सदर पुरस्कारासाठी प्रा. प्रदिप चापले यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा: नागभीड तालुक्यात पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू, मृत्यू कि आत्महत्या?
हेही वाचा: चंद्रपूर: वेकोली कार्यालयात कर्तव्यावर असताना दारूचा आनंद घेत असलेले कर्मचारी अखेर कॅमेऱ्यात कैद
पुरस्कारासाठी निवड झाल्याने इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर, समस्त संचालक मंडळ, वनश्री कला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक प्राध्यापक वृंदांनी प्रा. प्रदिप चापले यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा. प्रदिप चापले यांनी या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर, संस्थेचे संचालक मंडळ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील माजी रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, तत्कालीन रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. नरेंद्र आरेकर, विद्यमान रासेयो संचालक डॉ श्याम खंडारे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. विनोद चहारे, डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे, प्रा. सी. एस. मांडवे, प्रा. आर. एस. रोटके, प्रा. एस. एस. दोनाडकर व सहकारी प्राध्यापकांना दिले आहे. नोडल अधिकारी म्हणून कार्य करतांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रासेयो विभागीय समन्वयक, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि रासेयो स्वयंसेवक यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले. हे सर्व जण या पुरस्काराचे वाटेकरी आहेत, अशी भावना याप्रसंगी प्रा. चापले यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली आहे.