बिबट्याच्या हल्ल्यात ईसम ठार
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर येथे बिपट्याने हल्ला करून ईसमास ठार केल्याची घटना आज उघडकीस आली.
काल पासून शंकर घरी परत न आल्याने त्याचा आज शोध घेतला असता नरभक्षी बिपट्याने त्याचेवर हल्ला करून ठार केल्याचे दिसून आले. त्याचे शिर धडावेगळे ,एक हात तोडलेले दिसून येते आहे.
आष्टी परीसरात ही पाचवी घटना असून दोघांचा मृत्यू तर तिन जखमी झाले आहेत. वनविभागाने पेपरमील वसाहतीत बिपट्याला पकडण्यास तिन पिंजरे लावले आहेत मात्र बेकामी दिसून येत आहेत. आतातरी त्या नरभक्षी बिपट्याचा तातडीने बंदोबस्त न केल्यास कितीतरी जिवीतहानी होईल यात शंकाच नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.