चंद्रपूर शहरातील बस स्थानक परिसरात युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू - Batmi Express Chandrapur

Be
0

Chandrapur News,Chandrapur Lightning strikes,Marathi News, Lightningstrikes,News,Latest News in Marathi,Chandrapur Marathi News,Chandrapur News,Chandrapur  Live,Batmi Express
युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू 

चंद्रपूर:- चंद्रपूर बस स्थानक परिसरातील महसुल भवनाच्या छतावर केबलचे काम करत असलेल्या 22 वर्षीय युवकाचा विज पडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

हेही वाचा: चामोर्शी: धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा ईसम ठार, ईलूर जंगलात घडली घटना

शहरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरू होता. त्याचवेळी मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन वरती मुले केबल टाकण्याचे काम करीत होते. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि केबल टाकणाऱ्या अनिकेत नामक युवकाचा अंगावरती वीज पडली. अंगावर वीज पडल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. ( Young-man-was-electrocuted-and-died-in-the-bus-stand-area-in-Chandrapur )


मृतक युवकाचे पूर्ण नाव अनिकेत चांदेकर (वय 22) असून तो नागभीड येथे राहणारा आहे. अनिकेत सद्या चंद्रपुरातील बाबूपेठ येथे जुनोना चौक भाड्याने राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात केबल टाकण्याचे काम करीत होता.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->