Accident News: सोयाबीन तोडणीसाठी जात असलेला मजुरांचा टेम्पो उलटला, एका महिला ठार, 10 जण जखमी - Batmi Express सावली

Sawali Accident News,Marathi News, News,Latest News in Marathi,Chandrapur News,Chandrapur Accident News,सोयाबीन तोडणीसाठी जात असलेला मजुरांचा टेम्पो उ

Sawali Accident News,Marathi News, News,Latest News in Marathi,Chandrapur News,Chandrapur Accident News,सोयाबीन तोडणीसाठी जात असलेला मजुरांचा टेम्पो उ
सोयाबीन तोडणीसाठी जात असलेला मजुरांचा टेम्पो उलटला

सावली
:- सोयाबीन तोडणी करीता जात असताना सोयाबीन तोडणी मजुरांचा टेम्पो पलटी होवून त्या मध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सदर टेम्पो चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या महाकाली नगरजवळ रात्रीच्या सुमारास उलटला असून त्यामध्ये एक महिला मजूर ठार झाली आहे तर अन्य १० मजूर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

 हेही वाचा:  चंद्रपूर: वेकोली कार्यालयात कर्तव्यावर असताना दारूचा आनंद घेत असलेले कर्मचारी अखेर कॅमेऱ्यात कैद

स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले तर अन्य ४ गंभीर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णलयात भरती केले आहे. किरकोळ जखमींवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: नागभीड तालुक्यात पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू, मृत्यू कि आत्महत्या?

लताबाई टिकाराम थोरात (५५) उपरी असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम बोदलकर वय ५० संगीता रोहनकर वय ४० जनार्धन कुकडकर वय ५०, सुरज थोरात वय २२ वर्ष हे गडचिरोली येथे दाखल आहेत. उषा सातपुते वय ४०, रोशन कोठारे वय ३०, नीलिमा कोठारे वय २७, ललिता कोटगले वय ४० यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.