'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली: बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी - Batmi Express Gadchiroli

0

Marathi News, News,Latest NewsMarathi News, News,Latest News in Marathi,News,Gadchiroli News,Batmi Express,Marathi Batmya,Gadchiroli,Gadchiroli News
बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी 

आष्टी
: चामोर्शी तालुक्यातील आष्टी-इल्लुर पेपरमिल कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. 

बबिता दिलीप मंडल (४५) रा. पेपरमिल कॉलनी (आष्टी-इल्लूर) ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. हेही वाचा:  गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार

सकाळी ८ वाजताच्या सुमारास सदर महिला घरामागे भांडे घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीच्यावर हल्ला केला. दरम्यान तीने आरडाओरड सुरू केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी लागलीच धाव घेतली व बिबट्याच्या तावडीतून महिलेला सोडविले. यावेळी बिबट्याने परतीची वाट धरली. दरम्यान महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा आढळून आले, नशीब बलवत्तर म्हणून तीचे प्राण वाचले अन्यथा तीला आपले प्राण गमवावे लागले असते. हेही वाचा:  15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार तर 11 वर्षीय मुलावर अत्याचार

या परिसरात बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. याच पेपरमिल कॉलनीत एका ६ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला तसेच या परिसरातील मार्कंडा (कं) येथे ६ वर्षीय मुलाला ठार केले. बिबट्याची दहशत कायम असूनही आणि वनविभागाकडे या नरभक्षक बिबट्याला वारंवार जेरबंद करण्याची मागणी करूनही  वनविभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत आहे. या हल्ल्यास वनविभागाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असून लवकरात लवकर या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×