गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार - BatmiExpress.com

Be
0

Marathi News, News,Latest News in Marathi,News,Chandrapur News,Batmi Express,Marathi Batmya,Bhandara News,News
26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय

Bhandara
: जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ऐच्छिक पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली असून सदर २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी प्रदान करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. आ. नाना पटोले यांच्या पुढाकाराने ही बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा: चंद्रपूर शहरातील गौतमनगर भागात अनैतीक देहव्यापार अड्डयावर पोलिसांची धाड, तीन अल्पवयीन मुलींची केली सुटका

जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत मुंबई येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी  आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली तसेच आ. नाना पटोले प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन असिम गुप्ता, जिल्हाधिकारी भंडारा संदीप कदम, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन भंडारा अर्चना यादव यांचे उपस्थितीत गोसे प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसनाबाबत मुंबई येथे नुकतीच आढावा सभा घेण्यात आली.

हेही वाचा: शेतकरी युवकाचा खड्यात पडून मृत्यू

अधिक्षक अभियंता गोसे प्रकल्प मंडळ, नागपूर यांचे कार्यालयाकडून भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने ऐच्छिक पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. सदर २६ गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी प्रदान करण्याबाबत समेमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा अनेकांना लाभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->