पोर्ला मध्ये पती व सासूनेच लावली सुनेला आग
गडचिरोली:- गडचिरोली शहरापासून अवघ्या 15 की.मी. अंतरावर असलेल्या पोर्ला या गावात एका महिलेला , तिच्या नवऱ्याने आई आणि बहिणी च्या मदतीने रॉकेल टाकून पेटविल्याची घटना काल रात्री नऊ वाजता घडली.
सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता तिला नागपूर मेडिकल मध्ये पाठविण्यात आले आहे.
सदर जळलेल्या महिलेचा पोलिसांनी विचारणा केली असता , नवऱ्याने सासूने ननदेने रॉकेल टाकून जाळले अशे आपल्या बायानात सांगितले आहे.
पीडित महिलेच्या बयानावरून जिवे मारणे,हुंडा आणण्यासाठी त्रास देणे ह्या आरोपाखाली पती,सासू, आणि नंनद विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.