चंद्रपूर शहरातील गौतमनगर भागात अनैतीक देहव्यापार अड्डयावर पोलिसांची धाड, तीन अल्पवयीन मुलींची केली सुटका - BatmiExpress.com

Chandrapur Crime News,Marathi News, News,Latest News in Marathi,News,Chandrapur News,Batmi Express,Marathi Batmya

Chandrapur Crime News,Marathi News, News,Latest News in Marathi,News,Chandrapur News,Batmi Express,Marathi Batmya
चंद्रपूर शहरातील गौतमनगर भागात अनैतीक देहव्यापार अड्डयावर पोलिसांची धाड

Chandrapur Crime News:
 चंद्रपूर शहरातील गौतम नगर येथील अनैतिक देहव्यापार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी धाड टाकून तीन अल्पवयीन पीडित मुलींची सुटका केली. मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात एका ठिकाणी अनैतीक देहव्यापार चालु असल्याबाबत तकारी पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना प्राप्त झाले होत्या. त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे सुचना देण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार केले. 

हेही वाचा: वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाने मारली उडी

दि. 25 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीत गौतम नगर, चंद्रपूर येथे एक महिला अल्पवयीन मुलींकडून आर्थीक फायद्या करीता देहव्यापार करवून घेते अशा मिळालेल्या माहिती वरून सदर माहितीची बोगस ग्राहकाकडून खात्री करून गौतम नगर, चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने रेड कार्यवाही केली असता त्या ठीकानी दोन स्त्रीया या परराज्यातील मुलींकडून आर्थीक फायदया करीता देहव्यापार करवून घेताना मिळुन आल्याने त्यांना महिला पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून त्यांचे कडुन राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगना या परराज्यातील तीन पिडीत मुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार गृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. सदर कार्यवाहीत दोन आरोपी महीला विरोधात पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

चंद्रपूर शहरातील गौतम नगर येथील अनैतिक देहव्यापार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी धाड टाकून तीन अल्पवयीन पीडित मुलींची सुटका केली.

हेही वाचा: शेतकरी युवकाचा खड्यात पडून मृत्यू

सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे अधिकारी करीत आहे. सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक अरविंद साळवे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पो.नि. पुसाटे नियंत्रन कक्ष चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स. फौ. नितीन जाधव, पो. हवा. संजय आतंकुलवार, ना.पो.कॉ. सुधीर  मत्ते, पो कॉ, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलबार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.