Chandrapur News: वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाने मारली उडी - BatmiExpress.com

Be
0

Marathi News, News,Latest News in Marathi,News,Chandrapur News,वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाने मारली उडी,
वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाने मारली उडी

Chandrapur News
: चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या ठिकाणाहून निमगाव येथील राकेश बबनराव कांडूरवार या युवकाने उडी मारल्याची घटना घडली असून अशी तक्रार या युवकाची वडिलांनी सावली पोलिसांकडे केली आहे. घटनेची माहिती होताच सावली पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहे.  ( Youth jumped into the Wainganga river  )

राकेश बबनराव कांडूरवार या युवकाने आपल्या वडिलाला फोन करून मी गाडी, घडी व मोबाईल हे वैनगंगा नदीच्या पुलावर ठेवून जगाचा निरोप घेत आहे असे म्हटला. वडील बोलायच्या आतच त्यांनी मोबाईल बंद केला त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत वडील हे काही सहकारी सोबत वैनगंगा नदीच्या पुलावर गेले असता त्या ठिकाणी दुचाकी, मोबाईल, घडी सापडली आहे. 


त्यामुळे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. याच पुलावरून आठ दिवसांपूर्वी अंतरगाव येथील युवकाने उडी मारली होती.  त्याचे शव ही अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे पुन्हा या युवकाने उडी मारण्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. राकेश चा लग्न झालेला असून त्याला छोटा मुलगा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->