जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ मिळवूण देणार
Gadchiroli News: नागपूर महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी शुक्रवारी कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे महिला बचत गटाद्वारे चालविल्या जाणाऱ्या सीताफळ आणि जांभूळ प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली व महिलांशी संवाद साधला. या प्रकल्पात बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांना नागपूरसारख्या शहरात बाजारपेठ मिळवून दिल्यास महिलांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागेल, असा मनोदय करून त्यांनी तसा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: Gondia News: अखेर गोंदिया,चंद्रपूर रेल्वे 28 सप्टेंबर पासून सुरू होणार
यावेळी आयुक्तांनी महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला. तसेच त्यांनी बचत गटाच्या सीताफळ व जांभूळ प्रकल्पाचे त्यांनी विशेष कौतुक करून भविष्यात इतर ठिकाणीही महिला बचत गटाद्वारे असे विविध उपक्रम पाहावयास मिळतील, अशी आशा व्यक्त केली.