Gadchiroli News: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; नक्षलवाद्यांचा कॅम्प केला उद्ध्वस्त - BatmiExpress.com

Marathi News, News,Latest NewsMarathi News, News,Latest News in Marathi,News,Gadchiroli News,Batmi Express,Marathi Batmya,Gadchiroli,Gadchiroli News

Marathi News, News,Latest NewsMarathi News, News,Latest News in Marathi,News,Gadchiroli News,Batmi Express,Marathi Batmya,Gadchiroli,Gadchiroli News
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; नक्षलवाद्यांचा कॅम्प केला उद्ध्वस्त

गडचिरोली
: उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोठी हद्दीतील छत्तिसगढ़ सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपर्शी व मौजा फूलनार जंगल परीसरात नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावला असल्याच्या व घातपाताची मोठी योजना असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान रवाना करण्यात आले. सदर परीसरामध्ये कॅम्प उध्वस्त करण्याकरीता गेले असता काल दुपारी ०४.३० ते ०७.०० वाजताच्या दरम्यान कंपनी १० व भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. 

हेही वाचा:  गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार 

जवानांनी प्रत्युत्तरादाखल स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असता, पहिल्यांदा चकमक घडून आली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर जवानांनी पाठलाग केला असता, पुन्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला तेव्हा दुसऱ्यांदा चकमक घडून आली. तिथुन नक्षल्यांनी पळ काढल्यानंतर जवानांनी पुन्हा नक्षलवाद्यांचा पाठलाग करीत असतांना तिसऱ्यांदा चकमक घडून आली. यावेळी नक्षलवाद्यांनी संधीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जवानांनी न डगमगता त्यांना प्रत्युत्तरादाखल सडेतोड उत्तर देत नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले यात जवानांना नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त करण्यात मोठे यश मिळाले.

हेही वाचा: गडचिरोली: पोर्ला मध्ये पती व सासूनेच लावली सुनेला आग

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी मोठया प्रमाणावर व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून जवानांनी नक्षलविरोधात महत्वपूर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांची घातपाताची मोठी योजना उधळून लावण्यात यश मिळविले आहे. 

हेही वाचा: चंद्रपूर शहरातील गौतमनगर भागात अनैतीक देहव्यापार अड्डयावर पोलिसांची धाड, तीन अल्पवयीन मुलींची केली सुटका

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, पोलीस उपअधिक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, सी-६० प्राणहिताचे प्रभारी अधिकारी योगीराज जाधव यांनी सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले,
"विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत दिले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.