ब्रम्हपुरी शंभर टक्के कडकडीत बंद
ब्रम्हपुरी: शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा, शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा करा, वीज विधेयक 2020 बिल मागे घ्या, कामगारांना बरबाद करणाऱ्या चार श्रम सहिता रद्द करा, आणि पेट्रोल, डिझेल व गॅस भाव कमी करा या व इतर मागणीसाठी देशातील लाखो शेतकरी गेल्या नऊ महिन्यांपासून दिल्ली येथील विविध रोड वर रात्रंदिवस थंडी वाऱ्यात बसून आंदोलन करीत आहेत. परंतु केंद्रातील मोदी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. आणि म्हणून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सयुक्त किसान कामगार मोर्चाचे वतीने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद ची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध जन संघटनाच्या वतीने स्थानिक हुतात्मा स्मारक येथून दुपारी एक वाजता विशाल बैल बंडी ट्रॅक्टर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
तत्पूर्वी शिवाजी महाराज चौकात सभा घेऊन भारतीय कॅमुनिष्ट पक्षाचे नेते कॉ. विनोद झोडगे, काँगेस चे तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, सुनीता तिडके, रा.का.चे युवा नेते जगदीश पीलारे, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुखडाॅ. प्रेमलाल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते. डा. देवेश कांबळे, प्रहार जनशक्ती पक्षा मिलिंद भंनारे, बी.आर एस.पी.चे प्रा. संजय मगर, वंचित बहुजन आघाडीचे चे ॲड. हेमंत उरकूडे, खोरीपा चे राष्ट्रीय उपाद्यक्ष जीवन बागडे, समता सनिक दलाचे जयप्रकाश धोंगडे, मनसेचे तालुका प्रमुख सूरज शेंडे, ओबिसी संघटनेचे नेते हरीचंद्र चोले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इकबाल जेसानी, किसान सभेचे राहुल पांडव, लाल बावटा महिला संघटनेच्या नेत्या ललिता चौधरी, यांनी मार्गदर्शन केले.
भारत बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर, स्मिता पारधी, पंचायत समिती सदस्य थानेस्वर कायरकर, नगर सेवक महेश भररे, सोनू नाकतोडे, मुन्ना रामटेके, रां.का.चे तालुका अध्यक्ष वासू सौधरकर, मनोज वशाडे, राहुल भोयर, राजेश माते, सुधीर पिल्लारे, प्रफ्फुल करंडे, सुनील तोंधरे, अवि सोनवणे, जनता ठेंगरी, कांचन पिलारे, अनिल भानारकर, शिवसेना उप तालुका प्रमुख पराग माठे, शहर प्रमुख किशोर चौधरी, युवासेना प्रमुख अमोल माकोडे, माजी शहर प्रमुख शाम भानरकर, कमुनिष्ट पक्षाचे विनोद राऊत, विष्णू ठवरे, विवेक नरूले, अभिजित लोणकर, रवि अवसरे, महादेव राऊत, शंकर डोईजड, बी.आर. एस.पी.चे गोपाल मेंढे, मारखंडी बावणे इत्यादी पक्ष व जन संघटनांचे बहुसंख्येने कार्यकर्ते व जनता उपस्थित होते.