विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याचा गुदमरुन मृत्यू
Bhandara News: पालोरा ठेक्याने केलेल्या शेतातील मोटारपंप दुरुस्त करण्यासाठी विहीरीत उतरलेल्या शेतकत्याचा गुदमरुन मृत्यू झाला. सदर घटना मोहाडी तालुक्यातील करडी येथे दि. १९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजता दरम्यान उघडकीस आली. राजेश कृष्णा नंदुरकर (४०) रा.मुंढरी/ खुर्द असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मुंदरी / खुर्द येथील राजेश नंदुरकर या शेतकऱ्याने करडी येथील केशव राऊत या शेतकल्याची शेतजमिन ठेक्याने केली होती. शेतात धान पीकाला पाण्याची सोय व्हावी म्हणून शेतातील विहिरीवर मोटारपंप बसविले होते. दि. १९ सप्टेंबर २०२१ रोजी राजेश नंदुरकर याने घरी सांगून सायंकाळी ६ वाजता दरम्यान शेतात गेला...
हेही वाचा: पहिल्यांदाच गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मिटरने उघडले, गोसीखुर्दमधून 7293 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतातील मोटारपंप दुरुस्त करण्याकरीता विहिरीत उत्तरला. त्याचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही राजेश घरी न आल्याने त्याच्या घरच्या लोकांनी शेतावर जाऊन विहिरीत पाहिले असता राजेश मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती करडी पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. त्याचे मृत्यूपश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.