Gadchiroli News: रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

Gondwana University in Gadchiroli won the Raseyo Award,रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका ,Gadchiroli News

Gondwana University in Gadchiroli won the Raseyo Award,रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका ,Gadchiroli News
रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका

Gadchiroli News: 
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२०-२१ या वर्षाकरिता आज  राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ठ विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला असून, इतर पुरस्कारही याच विद्यापीठाने काबीज केले. (Gondwana University in Gadchiroli won the Raseyo Award )

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात नि:स्वार्थ भावना व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या सेवेचा गौरव व्हावा, या हेतूने १९९३-९४ पासून पुरस्कार देण्यात येतो. यंदा राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारसीनुसार गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ठ विद्यापीठाचा पुरस्कार ,स्मृतिचिन्ह प्राप्त.सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम समन्वयक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे डॉ.नरेश मधुकर मडावी यांना पुरस्कार जाहीर स्मृतिचिन्ह व १० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार. (Gondwana University in Gadchiroli won the Raseyo Award )

सर्वोकृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजुरा येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे गुरुदास दादाजी बल्की  यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह व ५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप.  सर्वोकृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार  गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजुरा येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना  जाहीर झाला आहे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप. उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कारांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका शामराव ठाकरे यांचा समावेश आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.