'
30 seconds remaining
Skip Ad >

11th Admission 2021: अकरावी प्रवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा - बातमी एक्सप्रेस

0

11th Admission 2021:  अकरावी प्रवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
11th Admission 2021:  अकरावी प्रवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

11th Admission 2021
: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. 

शिक्षणमंत्री म्हणाल्या : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक अ‍ॅप तयार केलं आहे. POEAM असं या अ‍ॅपचं नाव आहे. विद्यार्थी या अ‍ॅपचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आता POEAM या मोबाईल अ‍ॅपचा वापर करु शकतात. विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवर उपलब्ध होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

गुणवत्ता यादी जाहीर : 

शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशा विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. 

पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने केली जाते. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×