'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! पुण्यात मतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार, शहरात खळबळ - #Rape बातमी एक्सप्रेस

0
पुण्यात मतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे
शहरात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. दत्तवाडी परिसरातील जनता वसाहत परिसरात असणाऱ्या एका मतिमंद तरुणीवर अपहरण करून चार जणांच्या टोळीने तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. ( Gang rape of a mentally retarded girl in Pune )
दुरवेश जाधव, श्रीकांत सरोदे, आशिष उर्फ रड्या मोहिते, आदित्य पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, स्वारगेट परिसरामधून या चार नराधमांनी संबंधित पीडित तरुणीचे अपहरण करून तिला दत्तवाडी परिसरातल्या जनता वसाहतीमधील एका बंद खोलीत नेले आणि तिच्यावर आळी पाळीने बलात्कार केला.
याबाबत दत्तवाडी पोलिसांना सूत्रांकडून या घटनेविषयी माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत बलात्कारातील चारही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×