Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार.! - बातमी एक्सप्रेस

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार,Tiger Attack,

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार
Tiger Attack:  जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गोगाव येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना काल २५ ऑगस्ट रोजी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली. रामजी चुधरी (६५) रा.गोगाव  असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक रामाजी चुधरी हे शेतात पीक पाहणीसाठी गेले असता अचानक बांधाआड  दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवित नरडीचा घोट घेत  ठार केले. गेल्या दोन आठवडयातील तालुक्यातील तिसरी घटना आहे. सदर घटनेबाबत वनअधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असता वनअधिकारी घटनास्थळी पोहचून स्थळ पंचनामा केला. 

मानव वाघ संघर्ष सुरू असून कित्येज जण जखमी व जीव गमवावा लागत आहे. तरी संभाव्य नरभक्षक वाघाचे धोके लक्षात घेता नरभक्षक वाघाचा संबंधित वन विभागाने बंदोबस्त करावा.! मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.