Nagpur Crime: 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने लावले गुन्हेगारीला हात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- मोहम्मद जब्बार यांचे नागपूरच्या गंगाबाई घाट जवळ वाहनांच्या स्पेअर पार्ट चे मोठे दुकान आहे. तर सिद्धार्थनगर भागात त्यांचे आलिशान घर आहे. काहि दिवसा पूर्वी पर्यंत आरोपी असलेला 14 वर्षीय मुलगा यांच्या घरी पाळीव कबुतरांना दाणे टाकण्याचा काम करायचा. त्यामुळे जब्बार यांच्या घरची चांगल्या आर्थिक परिस्तिथीचे त्याला जाणीव होती. याचाच फायदा घेत या 14 वर्षीय मुलाने आपल्या दोन साथीदारानसह जब्बार यांच्या 12 वर्षीय मुलीला क्लास ला जात असतानी तिच्या गळ्याला चाकू लावून अडवीले.
तिचे हात पाय बांधून तिला निर्जन ठिकाणी नेले,आणि तिला 50 लाख रुपयांची मागणी केली, नाहीतर तुज्या आई वडील आणि भावाला आम्ही जीवाणीशी मारू अशी धमकी दिली. यामुळे मुलगी या घटनेत खूप घाबरली. त्यामुळे ती आपल्या घरातून काहि रक्कम आणून देईल अशी खात्री पटल्या नंतर तिन्ही आरोपिंनी त्या मुलीला सोडले. अगोदरच खूप घाबरल्या असल्यामुळे दोन ते तीन दिवस मुलीने घरचांना काहीच सांगितले नाही. मुलीची अवस्था पाहून कुटुंबातील माणसांनी तिला विश्वासाने विचारपूस केली असता मुलीने आई वडिलांना या घटने बद्दल सांगितले.
हे गंभीर स्वरूपाचे कळताच कुटुंबियांनी नागपूर पाचपावली पोलीस स्टेशन मधे तक्रार नोंदवली. मुलीच्या सांगितल्या प्रमाणे पोलिसांनी एका 20 वर्षीय गुन्हेगारासह 14 वर्षीय मुख्य आरोपीला आणखी एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.