बीड न्यूज: महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी तसेच बीड जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
जुलै ०८, २०२१
0
या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड हे सहअध्यक्ष असून सदस्य म्हणुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद,नगरपंचायत सर्व, जिल्हा पोलिस अधिक्षक, आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघामधील श्री. गायकवाड रानुबा मस्सा व श्री. सरपते भास्कर अप्पराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव समाज कल्याण विभागाचे सहायक आयुकत,डॉ.सचिन मडावी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.