Jammu Kashmir Live: जम्मू काश्मिरमधील शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. Read Also: Nagpur Coronavirus: नागपूरमध्ये ताज्या 5,131 प्रकरणे, 65 मृत्यू, सक्रिय प्रकरणे @ 51,576 नोंदली गेली
मागील 48 तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत 10 दहशतवादी ठार झाले. दहशतवादी संघटनेत नव्याने दाखल झालेल्या तरुणाचे मतपरिवर्तन करून शरण येण्याचे आवाहन जवानांनी केले.
$ads={2}
तरुणाच्या वडिलांनीही त्याला शरण येण्यासाठी विनवणी केली. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शरण येण्यापासून रोखल्याचे काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे. Read Also: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री
ठार झालेले तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.