'
30 seconds remaining
Skip Ad >

Dinvishesh: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती विशेष | Batmi Express Marathi

0

सावित्रीबाई फुले, वाढदिवस, महात्मा ज्योतीबा फुले जयंती, महात्मा ज्योतीबा फुले, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले, आधुनिक भारत, social reformer, Savitribai Phule, Mahatma Jyotiba Phule, birth anniversary

Dinvishesh: आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फूले यांची आज (11 एप्रिल) जयंती. आज जयंतीदिनी त्यांच्या कार्यावर एक नजर टाकुयात. साताऱ्यातील कटगुण गावी 11 एप्रिल 1827 साली जोतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांनी स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाचा अनेक शतकांपासून होत असलेल्या शोषणाचा व सामाजिक गुलामगिरीचा कडाडुन विरोध केला. Read Also: Nagpur Coronavirus: नागपूरमध्ये ताज्या 5,131 प्रकरणे, 65 मृत्यू, सक्रिय प्रकरणे @ 51,576 नोंदली गेली

$ads={2}

सावकारांविरोधात आणि नौकरशाहीविरूध्द त्यांनी युध्द पुकारले. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी महात्मा फुलेंनी मुलींकरता शाळा सुरू केली. त्यानंतर लगोलग महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरता शाळा सुरू केली, पुण्यात ज्योतिबांनी अस्पृश्य स्त्रियांकरता सहा शाळा चालविल्या.

त्यांच्या या प्रयत्नांचा सनातनी लोकांकडुन फार विरोध झाला पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या प्रयत्नाना कधीही सोडलेही नाही व थांबवले देखील नाही. आपल्या अंगणातील विहीर अस्पृश्यांकरता खुली केली त्यांना पाणी भरू दिले, बालविवाहाच्या प्रथेला प्रखर विरोध केला. Read Also: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री

विधवा विवाहाचे समर्थन केले, अश्या अनेक परंपरांना त्यांनी प्राधान्य देऊन सुरूवात केली. ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, संसार, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक, सत्यधर्म पुस्तिका असे ग्रंथ ज्योतिबांनी लिहीले. 

ज्योतिबा फुलेंनी शोषण व्यवस्थेविरूध्द व जातीव्यवस्थेविरूध्द युध्द पुकारले असतांना देखील समाजातील समतेला कुठेही धक्का लागू दिला नाही. त्यांनी अस्पृश्य स्त्रियांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केलेत.  Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

$ads={2}

सामाजिक परिवर्तन, ब्राम्हणांविरूध्द आंदोलन, बहुजन समाजाला आत्मसन्मान देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांची सुरूवात केली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून पुरोगामी विचारांची मांडणी समर्थपणे केली.  Read Also: Maharastra Lockdown Again:  मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक; निर्णयाकडे राज्याचे लक्ष 

आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या जोतिबा फुले यांना जनतेने महात्मा पदवी बहाल केली. दरम्यान, सामाजिक क्रांतीचा लढा लढत असताना त्यांनी 28 नोव्हेंबर 1890 साली अखेरचा श्वास घेतला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×