तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Outbreak Corona: अबब... मृत्यू आणि रुग्णात पुन्हा वाढ 937 पॉझिटिव्ह ; 11 मृत्यू; ब्रम्हपुरी 56, नागभिड 32, सिंदेवाही 24, मूल नऊ, सावली 47

Chandrapur Corona Cases Today:

 Chandrapur Outbreak Corona News, Chandrapur Outbreak Corona,Chandrapur Corona News,Coronavirus Outbreak Chandrapur,Chandrapur Live Corona News,Chandrapur Corona Updates,Chandrapur Corona Positive,Chandrapur Corona Dead

Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात मागील 24 तासात 305 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 937 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 11 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 33 हजार 529 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 759 झाली आहे.
$ads={1}

Chandrapur Corona Total Cases : 

सध्या 5278 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 608 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 63 हजार 228 नमुने निगेटीव्ह आले आहेत. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

Chandrapur Corona Death Today: : 11

आज मृत झालेल्यामध्ये सिंदेवाही येथील 67 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या ऊर्जानगर येथील 45 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 43 वर्षीय पुरुष व रामनगर येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 29 वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील 51 वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील 50 वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील 55 वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील 42 वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 492 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 448, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार

Chandrapur Corona Cases Today: 

आज बाधीत आलेल्या 937 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 241, चंद्रपूर तालुका 45, बल्लारपूर 47, भद्रावती 22, ब्रम्हपुरी 56, नागभिड 32, सिंदेवाही 24, मूल नऊ, सावली 47, गोंडपिपरी सहा, राजूरा 37, चिमूर 73, वरोरा 228, कोरपना 50, जीवती सात व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.  Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण

$ads={2}

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Read Also: तीन लग्नांचे वऱ्हाड पोहचले पोलीस ठाण्यात ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.