Pandharpur Election Update: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदारसंघातील शहर व ग्रामीण मधील एकूण ६४ मतदान केंद्राची निवडणूक निरीक्षिक दिब्य प्रकाश गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुकीसाठी १७ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांत केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी निरीक्षक गिरी यांनी केली. यामध्ये पंढरपूर, खर्डी ,कासेगांव, एकलासपूर, सिध्देवाडी, मंगळवेढा येथील ६४ मतदान केंद्रांची पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. Read Also:
Nagpur Coronavirus: नागपूरमध्ये ताज्या 5,131 प्रकरणे, 65 मृत्यू, सक्रिय प्रकरणे @ 51,576 नोंदली गेली$ads={1}
मतदान केद्रांवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहाची व्यवस्था व मतदान रांगामधील अंतरासाठी करण्यात आलेली व्यवस्था, दिव्यांग मतदारांठीची सुविधा तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेवून, आवश्यक सूचना श्री. गिरी यांनी यावेळी दिल्या.
मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच मतदान केंद्राचे निर्जंतुकीरण करण्यात आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण व मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी यावेळी दिली.यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री पवार, मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे उपस्थित होते.
Read Also: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.